Shivsena Hearing : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद
Continues below advertisement
शिंदे आणि ठाकरे गटासाठी सोमवार खूप महत्त्वाचा असेल.. याचं कारण दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या वेळी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर ३० जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती.त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून उद्या निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं औत्सुक्याचे असेल. उद्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी तर होणार नाही. हे युक्तिवाद लिखित स्वरूपात मिळाल्यानंतर पुढच्या काही दिवसात निवडणूक आयोग चिन्ह बाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो.
Continues below advertisement
Tags :
Election Commission Thackeray Monday Shinde Direct Arguments Written Arguments Constitutional Issues Accusations Against Each Other