Omkar Elephant : महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम कोकणात
Continues below advertisement
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवर उपद्रवी ओंकार हत्तीला पकडण्यासाठी बांदामध्ये वन विभागाची टीम दाखल झाली आहे. कळपापासून वेगळा झालेला ओंकार हत्ती गेल्या काही आठवड्यांपासून आक्रमक झाला होता. ओंकार हत्तीला पकडण्यासाठी खास प्रशिक्षित टीम दाखल झाली आहे. कर्नाटकातील प्रशिक्षित कुमकी हत्ती देखील या ठिकाणी आणला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळाची पाहणी करत होती. ओंकार हत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावमध्ये नुकसान केले आहे. भर वस्तीमध्ये हत्ती येत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भातशेती आणि केळी बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी ओंकार हत्ती कास पंडितवाडी इथे भर वस्तीमध्ये येऊन गेला. हत्ती सुमारे तासभर रस्त्यावर असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहने रोखण्यात आली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement