NCB प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध? बाहेरचे अधिकारी मराठी लोकांना त्रास देतायत : Sanjay Raut

Sanjay Raut on Mumabai Cruise Drug Case : गेल्या बराच काळापासून मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. कालच त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर याप्रकरणाला काहीसं वेगळं वळण लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्यावरुन सध्या वादंग उठला आहे. तसेच, त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणाबाबत संवाद साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola