Wankhede Defamation Notice|'The Bads of Bollywood' वेब सीरिजविरोधात Wankhede यांची याचिका स्वीकारली
Continues below advertisement
आर्यन खान दिग्दर्शित 'The Bads of Bollywood' ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजवरून समीर वानखेडे आणि खान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी वेब सीरिजविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने वानखेडे यांची याचिका स्वीकारली आहे. या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली हायकोर्टाने शाहरुख खानच्या Red Chillies कंपनी आणि Netflix ला नोटीस बजावली आहे. 'The Bads of Bollywood' या सीरिजद्वारे आपली बदनामी केल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे. दिल्ली हायकोर्टाने Red Chillies आणि Netflix ला तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीस नोव्हेंबरला होणार आहे. यामुळे 'The Bads of Bollywood' वेब सीरिज आणि त्याभोवतीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement