VSI Inquiry: 'कोणतीही चौकशी नाही,' मुख्यमंत्री म्हणाले; मग आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश कुणाचे?
Continues below advertisement
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), रोहित पवार (Rohit Pawar) आणि मुख्यमंत्री (Chief Minister) केंद्रस्थानी आहेत. 'वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू केलेली नाही, तक्रारच आलेली नाही तर चौकशी करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दुसरीकडे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर अजित पवार नियामक मंडळावर आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना शह देण्यासाठीच ही चौकशी लावल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही, 'भाजपाने ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला आहे,' अशी टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement