Santosh Banger on Satyacha Morcha :'पराभव दिसल्याने MVA चा मोर्चा',बांगरांचा पलटवार
Continues below advertisement
महाविकास आघाडीने (MVA) मतदार याद्यांमध्ये (Voter List) घोळ असल्याच्या विरोधात पुकारलेल्या मोर्चावर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी जोरदार टीका केली आहे. 'मोर्चा काढला म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्हाला पराभवाला समोर जायचं आहे,' असं म्हणत बांगर यांनी MVAवर निशाणा साधला. लोकसभेला ज्या मतदार याद्यांवर तुमचे खासदार निवडून आले, त्याच याद्या आता विधानसभेला चुकीच्या कशा वाटतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये एकवाक्यता नाही आणि ते खेकड्यासारखे एकमेकांना मागे खेचत आहेत, असेही ते म्हणाले. आघाडी केवळ लोकांची दिशाभूल करत असून त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असा दावा बांगर यांनी केला. या मोर्चाला जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement