Raj Uddhav Thackeray on Voter List Row: मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू निवडणूक आयोगावर आक्रमक
Continues below advertisement
महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आयोगाला धारेवर धरले. 'दुबार मतदार असतील तर त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान नेमकं कुठे करणार आहात, पण नावं डिलीट करणार नाही', असे उत्तर निवडणूक आयोगाने दिल्याचे समोर आले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी, 'निवडणुका घोषित झालेल्या नसताना मतदार नोंदणी का बंद केली?' आणि 'VVPAT शिवाय निवडणुका कशा घेता?' असे थेट सवाल विचारले. तर, 'मतदान कुणाला जातंय हे कळणार नसेल तर संभ्रम निर्माण होईल', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी VVPAT च्या वापराची मागणी केली. विरोधकांनी मांडलेले सर्व मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले जातील, असे आश्वासन राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement