Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे. या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला. आता सून गिरीजा राऊत यांच्या आरोपावर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले. (Vinayak Raut On Girija Raut)