एक्स्प्लोर
Relationship Agreement: '...हा लव्ह जिहादचा नवा प्रकार', VHP चे प्रवक्ते Shriraj Nair यांचा गंभीर आरोप
बोरिवलीतील (Borivali) एका तरुणीच्या 'लिव्ह-इन रिलेशनशिप ऍग्रीमेंट'वरून (Live-in Relationship Agreement) नवा वाद पेटला आहे. शाहिद शेख (Shahid Sheikh) नावाच्या तरुणासोबत पळून गेलेल्या या तरुणीने केलेल्या करारानंतर, विश्व हिंदू परिषदेने (VHP) हा 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) नवा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. 'मला माझी मुलगी पाहिजे, मी सगळ्यांना सांगतेय,' असा टाहो पीडित मुलीच्या आईने फोडला आहे. या प्रकरणात VHP चे प्रवक्ते श्रीराज नायर (Shriraj Nair) आणि भाजप आमदार संजय उपाध्याय (BJP MLA Sanjay Upadhyay) यांनीही उडी घेतली आहे. मुलीच्या आईने VHP कडे मदत मागितल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुलीला परत आणले होते, मात्र ती पुन्हा पळून गेली. हा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करार पूर्णपणे बेकायदेशीर असून मुलींचे शोषण करण्यासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप VHP आणि भाजप नेत्यांनी केला आहे. याविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















