(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ameen Sayani Passes Away : प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन
Amin Sayani Passed Away : प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन
मुंबई: रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी (Ameen Sayani Passed Away) यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी (Ameen Sayan) यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी (Ameen Sayani) यांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या खास आवाजातील 'बहनों और भाईयो आप सुन रहे है...' ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. अमीन सयानी यांच्यावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.