एक्स्प्लोर
VBA vs RSS: 'RSS वर बंदी आणा', सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा; पोलिसांनी परवानगी नाकारली
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने (VBA), सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. 'RSS ने तिरंग्याला विरोध केला, संविधानाऐवजी मनुस्मृतीनुसार देश चालवण्याचे प्रयत्न केले', असे X Post करत प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. असे असूनही, वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी RSS कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















