एक्स्प्लोर
Diwali Festival : मराठवाड्यात अतिवृष्टी, तरीही वसुबारसचा उत्साह; शेतकरी साजरा करतोय दिवाळीचा पहिला दिवस
आज वसुबारसने (Vasu Baras) दिवाळीला सुरुवात झाली असून राज्यभरात गाय-वासराची पूजा करून सण साजरा केला जात आहे. 'मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं असताना देखील वसुबारसेचा उत्सव काही कमी झालेला नाहीये,' असं चित्र परभणीत (Parbhani) दिसून आलं. कोल्हापुरात (Kolhapur) गोरक्षक संताजी बाबा घुरपडे यांनी फुलांनी गोठा सजवून गोमातेची पूजा केली, तर जळगावच्या (Jalgaon) पांजरापोळ गोशाळेतही (Panjrapol Goshala) सकाळपासून गर्दी होती. दुसरीकडे, दिवाळीच्या बाजारपेठेतही बदल दिसतो आहे. रायगडमध्ये (Raigad) पारंपरिक कंदिलांऐवजी पर्यावरणपूरक आणि टिकाऊ कापडी कंदीलांना (Cloth Lanterns) मोठी पसंती मिळत आहे. हे कंदील पुन्हा वापरता येत असल्याने ग्राहक त्यास प्राधान्य देत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















