एक्स्प्लोर
Varsha Gaikwad : 'तो त्यांचा वैयक्तिक निर्णय', BMC निवडणुकीतील भूमिकेवरून Congress मध्ये मतभेद?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आगामी BMC निवडणूक स्वबळावर लढण्याची आणि ठाकरे बंधूंसोबत (Uddhav Thackeray, Raj Thackeray) जाणार नसल्याची भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना, 'तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील,' असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विषय हायकमांडवर ढकलला. वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मान्यतेनेच घेतला जाईल. त्यामुळे, स्थानिक नेत्यांनी स्वबळाची भाषा केली असली तरी, महाविकास आघाडीचे भवितव्य दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















