Donald Trump Terrif : डोनाल्ड ट्रम्प भडकले, चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ
Continues below advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यातील संभाव्य भेट रद्द होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. 'जिनपिंग सोबतची भेट रद्द केली नाही पण होईल असं वाटत नाही', असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने 'रेअर अर्थ मिनरल्स'च्या (Rare Earth Minerals) निर्यातीवर निर्बंध घातल्याने ट्रम्प यांनी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकेने ५ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, Nasdaq Composite निर्देशांक ३.५६ टक्क्यांनी कोसळला आहे. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल दीड लाख कोटी डॉलर्सचे (1.5 trillion dollars) नुकसान झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement