एक्स्प्लोर
Loan Waiver Controversy: 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय', सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानावरून गदारोळ
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 'वादग्रस्त एखादं विधान करुन सरकारला त्रास होईल, असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील,' असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, 'शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीनं दिलेला होता'. मात्र, सरसकट कर्जमाफी न करता, त्यासाठी एक समिती नेमली असून, सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
















