एक्स्प्लोर
Thane Rains: बदलापुरात 'ढगफुटी', दिवाळीच्या उत्साहावर पाणी; एका तासात 101.8 mm पावसाची नोंद.
ठाणे (Thane) जिल्ह्यात, विशेषतः बदलापूर (Badlapur) आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) मंगळवारी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. बदलापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला, जिथे अवघ्या एका तासात १०१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) तयारीवर परिणाम झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे दारातील रांगोळ्या पुसल्या गेल्या, मुलांनी बनवलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि आकाश कंदिलांचे मोठे नुकसान झाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि दुकानदारांची एकच धांदल उडाली, तर कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या पावसामुळे नागरिकांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















