Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं

Continues below advertisement

Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं
निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे, असं म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं.   निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटलं होतं.  या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारलं. आज शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे.   राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram