Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा

Continues below advertisement
मुंबईत झालेल्या सत्याच्या मोर्चातून (Satyacha Morcha) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रच्या नंतर महाराष्ट्रामधे सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा मोर्चा विरोधी पक्षांचा नसून लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांची एकजूट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढे लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे,' अशा शब्दात ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola