एक्स्प्लोर
Uddhav Slams BJP: 'हे गोमूत्रधारी हिंदुत्व, आमचं नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे हिंदुत्व हे 'गोमूत्रधारी' असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. 'गोमूत्रधारी हिंदुत्व आहे यांचं, हिंदुत्व आपलं नाहीये,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या गोमांस धोरणातील दुटप्पीपणावरही त्यांनी बोट ठेवले. 'ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय?' असे म्हणणारे किरण रिजिजू आजही मंत्रिमंडळात आहेत, मग जे गोमांस खातात त्यांनी पाकिस्तानात जावे, असे म्हणणारे मुख्तार अब्बास नक्वी कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मेघालयचे भाजप प्रमुख अर्नेस्ट मावरी हे देखील गोमांस खात असल्याचे ठाकरे यांनी निदर्शनास आणले. निवडणुका जवळ आल्या की भाजप हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करते, असा आरोपही त्यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















