Maharashtra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
Continues below advertisement
ठाण्यातील दिवंगत नेते अनंत तरे यांच्यावरील 'अनंत आकाश' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'तेव्हाच जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येतंय म्हटल्यानंतर अमित शहांच्या चरणी लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबर्डा फोडणारी माणसं दिसली नसती,' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तरे यांनी आपल्याला दगा कोण देईल याबाबत आधीच सावध केले होते, पण त्यांचे ऐकले नाही याचा पश्चाताप होतोय, असेही ठाकरे म्हणाले. भाजप आपल्याला संपवायला निघाले आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या संकटाला तोंड दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. अनंत तरे यांनी Eknath Shinde यांच्याबद्दल भाकित केले होते की ते दुसरे नारायण राणे होतील आणि हे भाकित खरे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement