Marathwada Visit : 'सरकार दगाबाज असेल तर दगेनीच मारा', Uddhav Thackeray यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी संवाद साधला आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 'सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनीच मारणं पाहिजे,' असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन देणारे आता कुठे गेले, असा सवाल करत त्यांनी फडणवीसांना 'चोर' म्हटले. तसेच, कर्जमाफी न केल्यास नाव बदलण्याचं आव्हान देणाऱ्या अजित पवारांचीही त्यांनी खिल्ली उडवली. शेतकऱ्यांना आताच कर्जमाफी द्या, मगच मत देतो, अशी भूमिका घेण्याचं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola