Central Team Row: 'केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा सरकारला टोला

Continues below advertisement
मराठवाड्यातील (Marathwada) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकावरून (Central Team) राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पथकाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. 'गावोगावी बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा,' असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. सोलापूरच्या (Solapur) मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात नुकसानीची पाहणी केल्याने शेतकरी आणि सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यानंतर पथकाने दक्षिण सोलापूरमधील कोळेगाव येथे दिवसा पाहणी केली. यावर असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, पथकाचा हा दौरा तीन दिवसांचा असून, ते राज्य सरकारने सुचवलेल्या सर्व प्रमुख नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. त्यामुळे रात्रीची पाहणी ही केवळ दौऱ्याचा एक भाग असू शकते, असे सांगितले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola