एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Beed : शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करा, बीडमध्ये सरकारविरोधात सूर
बीड (Beed) जिल्ह्यातील पालेगाव येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसान, अपुरी मदत आणि कर्जमाफी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आपली व्यथा मांडली. 'सहा महिन्यानंतर घोषणा करुन काही उपयोग होणार नाही. आज ती कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे,' असा थेट सवाल करत एका शेतकरी प्रतिनिधीने सरकारवर निशाणा साधला. अतिवृष्टीमुळे कापसासह (Cotton) अनेक पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शासनाकडून मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांची गुरेढोरे वाहून गेली आहेत. पिकांना योग्य हमीभाव (MSP) मिळत नसल्याने आणि कर्जमाफी लांबणीवर पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण तातडीने राबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























