एक्स्प्लोर
Uddhav Thackray Farmers Protest: 'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या',उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 'हंबर्डा मोर्चा' काढण्यात येत आहे. 'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,' अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आणि त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी या मोर्चाद्वारे केली जात आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असून, उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















