Maharashtra Politics: 'गद्दाराला मी उत्तर देत नाही', Uddhav Thackeray यांची Eknath Shinde यांच्यावर सडकून टीका

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील 'हंबरडा मोर्चा'वरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मोर्चावर जोरदार टीका केली आहे. 'तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची लायकी नाही', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी कोविड काळातील खिचडी आणि डेड बॉडी बॅग घोटाळ्यांचा उल्लेख करत, 'त्यांनी स्वतःवरच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं', असा टोला लगावला. 'उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघावं', या फडणवीसांच्या टीकेवर ठाकरे यांनी, 'मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा', असे उत्तर दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola