एक्स्प्लोर
Maha Politics: 'Anaconda मुंबई गिळायला आला, पोट फाडून बाहेर काढू'- Uddhav Thackeray
महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अमित शाह (Amit Shah), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. 'अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला, त्याला मुंबई गिळायची आहे, तुझं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही', असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिला. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच 'भस्म्या रोग' झालेला 'अॅनाकोंडा' म्हटले आहे, ज्यांनी मुंबईची तिजोरी, खिचडी, डांबर आणि भूखंड गिळले तरी पोट भरत नाही. दुसरीकडे, अमित शाह यांच्या 'कुबड्या' टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी, भाजपच देशभरात अनेक ठिकाणी कुबड्यांवर सत्तेत असून महाराष्ट्रातही दोन कुबड्या असल्याचा टोला लगावला. बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या मदतीची आठवण करून देत, स्वाभिमान असेल तर शिंदे आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















