एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Thackeray vs Shinde: हेलिकॉप्टरने जातो, रेडा कापतो की शेती?; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरने शेतात जातो,' असा टोला ठाकरेंनी शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरून लगावला. ठाकरेंनी शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून, मुंबई आणि ठाणे महापालिकेची तिजोरी लुटल्याचे म्हटले आहे. येत्या सोमवारी भ्रष्टाचाराविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील सोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. घरातलं शत्रुत्व संपवून आपल्या मुळावर आलेल्या शत्रूला उखडून फेकण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. ठाणेकरांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















