Voter List Row: 'वोट चोरी'च्या आरोपांवरून Thackeray-BJP आमनेसामने, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मतदार यादीतील (Voter List) गोंधळावर पत्रकार परिषद घेणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे भाजपचे (BJP) आशिष शेलार (Ashish Shelar) पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार आहेत. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या 'वोट चोरी'च्या आरोपांवरती ते मोठा गौप्यस्फोट करतील अशी चर्चा आहे. यासोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे, तर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मुंबईतील रॉक्सी सिनेमात (Roxy Cinema) मनसेने (MNS) मराठी चित्रपट दाखवण्यासाठी आंदोलन केले. पुण्यातील वादग्रस्त जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानंतर ते पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, कोल्हापूरमधील वनतारा (Vantara) परिसरात हत्तीण माधुरीची (Elephant Madhuri) उच्चस्तरीय समितीकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola