Thackeray Reunion: 'लालं गेलं गंगेला...', ठाकरे बंधूंच्या एकीवर Chandu Mama स्पष्टच बोलले!

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूंमधील दोन दशकांचा दुरावा आता कौटुंबिक पातळीवर संपल्याचे चित्र दिसत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने दोन्ही नेते बहीण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले, ज्यामुळे त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांचे मामा चंदू मामा म्हणाले, 'लालं गेलं गंगेला मारलं, आता नवीन पर्वत आहे आणि दोघांतही प्रेम असतंच वाढत राहणार आणि मराठी माणसांची चांगली गोष्ट आहे.' गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये जयजयवंती यांचे पुत्र यश देशपांडे यांच्या लग्नसमारंभात दोन्ही भाऊ एकत्र दिसले होते आणि तेव्हापासूनच हे मनोमिलन सुरू झाल्याचे बोलले जाते. चंदू मामांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत दोन्ही भाच्यांनी एकमेकांवरील प्रेम कायम ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola