PM Face Politics: 'Rahul Gandhi PM होणं हे दिवास्वप्न', Uday Samant यांची Sanjay Raut यांच्यावर टीका
Continues below advertisement
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पंतप्रधान पदावरून शाब्दिक चकमक उडाली आहे. 'आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे, तुम्ही मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले', असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल या आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या वक्तव्यावर राऊत प्रतिक्रिया देत होते. याच वक्तव्याची उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे. 'राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे एक दिवास्वप्न आहे', असं म्हणत सामंत यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे मुंबई महापौर पदावरून महाविकास आघाडीत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement