Traffic Police Attack | वाहतूक पोलिसांवरील जीवघेणे हल्ले कधी थांबणार?वाहनचालकांची मुजोरी कशी रोखणार?
Continues below advertisement
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसाने टेम्पो चालकाला गाडी थांबवण्यासाठी इशारा केल्याने चालकाने गाडीच अंगावर घातल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. यात पोलीस नाईक सागर चौबे या वाहतूक पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Continues below advertisement