Patanjali Coronil | रामदेवबाबांच्या 'कोरोना किट'च्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही: अनिल देशमुख
Continues below advertisement
रामदेव बाबांच्या पतंजलीकडून निर्माण केलेल्या कोरोनिल आणि श्वासारी या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे. या औषधाबाबत जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सर्व तपासणी करत आहे. योगी रामदेव यांना बनावट औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement