Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर
Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दादरच्या शारदाश्रम शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थी पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकले होते. 'आम्हाला इकडे जगावं की नाही आम्हाला संताप येतोय,' असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका केली. जिल्हाधिकारी यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केल्या असून, अवजड वाहनांच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या, त्यामुळे आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement