TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha
तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस बीडला रवाना, आज कोर्टात करणार हजर
सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर...घरातील उर्वरीत साहित्याला अज्ञातांकडून आग...
राज्यभरात धुलिवंदनाचा मोठा उत्सव, ठिकठिकाणी रंगांची उधळण तर मराठी कलाकारांसह राजकीय नेतेही साजरी करणार धुळवड
लहान-थोरांपासून सेलिब्रेटींपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत होळी धुमधडाक्यात, कोकणातही शिमगोत्सवाचा उत्साह
होळी, धूलिवंदन, रमजाननिमित्त मुंबईत पोलीस बंदोबस्त...पाच अतिरिक्त सहआयुक्त, १८ डीसीपी, ५१ सहपोलीस आयुक्तींची टीम, पाच आरसीपी कंपनी, आठ क्यूआरटी पथकांसह बॉम्बशोधक पथकही तैनात
राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा, सप्टेंबरपर्यंतचं १५३ कोटींचं थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का, १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास गृहमंत्रालयाची मंजुरी
ठाण्यात पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेल सांडल्याने अनेक अपघात, पोलीस आणि अग्निशमन दलाची धावपळ, एकाच मार्गावरुन वाहतूक सुरु
आमिर खाननं दिली तिसऱ्या प्रेमाची कबुली...२५ वर्षांपासून मैत्रीण असलेल्या गौरीसोबत डेट करत असल्याचं केलं जाहीर...
युरोपियन युनियनला अध्यक्ष ट्रम्प यांचा २०० टक्के कर लावण्याचा इशारा, अमेरिकन व्हिस्कीवर युरोपमध्ये ५० टक्के कर लावल्याने ट्रम्प नाराज
मुंबई इंडियन्सची वुमन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये धडक, गुजरातवर दणदणीत विजय; हिली-नताली-हरमनप्रीतची ऐतिहासिक खेळी