TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑगस्ट 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑगस्ट 2024 : ABP Majha

राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.  
अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्वाची बैठक,अमरावती आणि यवतमाळच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन,नाना पटोले,विजय वडेट्टीवारांसह इतर नेते राहणार उपस्थित.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू देशाला संबोधणार,स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने एक दिवस आधी होणारे कार्यक्रम.
विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती...
लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं...अजित पवारांची कबुली...
लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...
लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा ताशेरे...पुण्यातल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाची तंबी...
इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेचं मोठं पाऊल, आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रात तैनात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram