(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 26 Sept 2024
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 26 Sept 2024
मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघरमधील शाळांनाही आज सुट्टी, हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी.
पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश, आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज.
मुंबईत काल रात्री पासून पावसाची उसंत, मात्र दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.
मुंबईची तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत, काल पावसामुळे लोकलसेवा खोळंबली होती.
पुण्यात पावसाची विश्रांती, काल झालेल्या जोरदार पावसानंतर पुणेकरांना दिलासा.
मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, सकाळी 8.30 पर्यंत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचं आवाहन.
मुंबईतील विविध ठिकाणांवर अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष, पालिकेच्या नियंत्रण कक्षातून ठेवली जातेय नजर, पालिका आयुक्त भूषण गगराणींनीही घेतला आढावा.
मुंबईतील सिप्झसमोर ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात एक महिला पडली, जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू.
मुंबईतील शिवडीच्या परळ व्हिलेजमध्ये अनेक घरांत पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ