Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP Majha
Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP Majha
महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली, दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता.
भाजप आणि शिवसेना त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता, दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मंत्रिपद रिक्त ठेवणार का याकडे लक्ष
शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, शिवसेनेकडून यावेळी नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना यावेळी नारळ दिला जाण्याची शक्यता.
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार, ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती, रविंद्र चव्हाण, नितेश राणे,मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळसह राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळण्याची शक्यता