Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 12 April 2025 | ABP Majha

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 12 April 2025 | ABP Majha 
आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी, राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचंही आयोजन. 
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन. 
किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती.  
गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली शिवरायांची पालखी. रायगडावरील भाषणानंतर अमित शाहांनी वाहिली शिवरायांची पालखी. पालखीला पुढे अमित शाहांचा तर मागे उदयनराजेंचा खांदा  
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं जगदिश्वराचं दर्शन, दर्शनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि अजित पवारही उपस्थित. 
पाचाडमध्ये जिजाऊंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola