Top 50 News Superfast News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 14 May 2025 | ABP Majha

Top 50 News Superfast News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 14 May 2025 | ABP Majha 

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येतील, ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच, प्रत्यक्षात दोन्ही गट एकत्रित येतील याबद्दल राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा सुरू नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून स्पष्ट.  

पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होत असतात, मात्र या चर्चांचं पुढे काही होत नाही, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं राष्ट्रवादीच्या  एकत्रिकरणाच्या चर्चेवर विधान 

ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची पक्षप्रवेशासाठी चढाओढ असल्याचं चित्र.  

तेजस्वी घोसाळकर आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, घोसाळकरांना कालच मातोश्रीवरुन भेटीसाठी बोलावणं, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर घोसाळकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष.  

तेजस्वी घोसाळकर पक्ष सोडतील असं वाटत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola