Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 डिसेंबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 डिसेंबर 2024: ABP Majha
महायुती सरकारच्या आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ नाराज झाले असून आजच त्यांनी नाशिकमधील आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी देखील आपली नाराजी उघड केली, आता मराठा आरक्षणाचे लढवय्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर (Chhagan bhujbal) जोरदार हल्लाबोल केला. भुजबळ कुठेही जात नाहीत ते दुसरीकडे कुठे गेले तर जेलमध्ये जातील. पण, ते शरद पवारांची राष्ट्रवादीही फोडणार. शिवसेना फोडली, शरद पवारांचाही पक्ष फोडला. आता ते फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालतील. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ओबीसींवर अन्याय झाला असं ते म्हणतात. मग, गेल्यावेळी मंत्री नव्हते का? किती दिवस ओबीसींचे खाता असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले.
नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडाळाच्या विस्तारात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र, दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांना देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी आपली नाराजी उघड केली. नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते विधिमंडळात गेले होते. मात्र, नागपूरहून नाशिकला परतले असून आता मी अधिवेशनाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आज मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी देखील नाराजी बोलून दाखवली. आता, भुजबळ यांच्या नाराजीवर मनोज जरांगेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, ते कुठेही जात नाही, दुसरीकडे गेले की जेलमध्ये जातील, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना डिवचलं.