TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
बीड, परतूर, फुलंब्री, कन्नड, हिंगोली आणि पाथरीमध्ये उमेदवार देणार, मनोज जरांगेंची घोषणा, तर गंगाखेड, भोकरदन, कळमनुरीत उमेदवार पाडण्याचा निर्धार
अनेकांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं जरांगे कुणाला पाठिंबा देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष, थोड्याच वेळात जरांगे घोषणा करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये गेल्या दोन तासांपासून चर्चा... उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांवर होणार चर्चा
अर्ज मागे न घेणाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा, तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोर अर्ज मागे घेण्याचा विश्वासही व्यक्त
अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे पाकिटमारांची टोळी, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर वादाला तोंड,
तर कळवा मुंब्र्यात येऊन आव्हाडांना उत्तर देणार,
मिटकरींचा प्रतिहल्ला
लोकसभेत साहेबांना खूश केलं आता मला खूश करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन, नियम मोडून पाणी आणल्याची आठवण
महायुती धर्माला तिलांजली देत प्रचाराची भाषा, माहिममध्ये अमित ठाकरेंसाठी तर मानखुर्दमध्ये मलिकांविरोधात भाजपचा प्रचार, सत्तार आणि दानवेंचा एकमेकांना पराकोटीचा विरोध
भाऊबीजेचा आज देशभरात उत्साह.. चित्रा वाघ, प्रसाद लाड, युगेंद्र पवार, रोहित पाटील, अंकिता -राजवर्धन पाटलांनी साजरी केली भाऊबीज
न्यूझीलंडचा भारताला ऐतिहासिक व्हाईटवॉश, तिसऱ्या टेस्टमध्ये २६ धावांनी लाजीरवाणा पराभव, १४७ धावांचं लक्ष्य गाठण्यात टीम इंडिया अपयशी