TOP 25 : राज्यातील 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार रोहित पवारांचा वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, रोहित पवारांकडून आगामी काळात मंत्री होण्याचे संकेत.
बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजर राहण्याचे मनोज जरांगेंचे संकेत, परंपरेचा मेळावा होईल, राजकारणाचा आणि जातीचा मेळावा नसेल, जरांगेंचं वक्तव्य.
अमित शहांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, जरांगेंचा अमित शहांना इशारा, तर मराठ्यांना आरक्षण दिले तर तुम्हाला सत्तेपासून कोणी दूर करणार नसल्याचंही जरांगेंचं वक्तव्य.
हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी, अनेक गावात लागले गाव बंदीचे बॅनर.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात मनसेत मोठे फेरबदल, अमित ठाकरेंच्या दौऱ्यात युवा पदाधिकाऱ्यांना बढती तर नव्या चेहऱ्यांना कार्यकारणीत संधी.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी विद्याथ्यांना १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार, विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन.