Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही असं निरीक्षण नोंदवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशीकरता पोलीस तपासाची सगळी कागदपत्रे जमा करण्याचे सीआयडीला निर्देश देण्यात आले. अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील पुढील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.   बदलापुरातील एका नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू झाला. त्यावरून उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.    इतके दिवस झाले तरी राज्य सरकार तपासाबाबत गंभीर दिसत नाही अस उच्च न्यायालयाने म्हटलं. तुमच्याकडून काय अपेक्षा होती, आणि तुम्ही काय करताय? अशा शब्दात उच्च न्यायालयाने सीआयडीला फटकारलं.  त्यावर या प्रकरणात अजूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचीच प्रक्रिया सुरू असल्याची सीआयडीकडून कोर्टात माहिती देण्यात आली.  त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram