TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 10 PM
पुण्यातील धानोरी, कात्रज, विमान नगरसह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, ११ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज.
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी, कंबरेपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत.
पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद, महत्त्वाच्या रस्त्यांना नदीच स्वरूप, शिवाजी नगर, अलका टॉकीज चौक, कोथरुड भागात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.
पुण्यामध्ये शिवाजीनगर भागात ६८ मिमी पावसाची नोंद, ९ जून ते १२ जूनदरम्यान पुण्यासह राज्य़ात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी.
पुण्यामध्ये कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लडसारखी स्थिती, झाडं पडणे, भिंती पडण्यासारख्या घटना घडत असल्याने पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, मुरलीधर मोहोळ यांचं नागरिकांना आवाहन.
संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये ६७.४ मि.मी, पाषाण इथे ५६.८ मिमी, हडपसर इथे ३ मिमी पाऊस झाल्याची नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची ट्विटद्वारे माहिती.
मुंबईत पुढील ४८ तासात बरसणार सरी, वेळेआधीच मॉन्सून आल्याने उष्णतेने त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, हवामान विभागाकडून उद्या परवा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट.
रत्नागिरी शहरामध्ये मुसळधार पाऊस, मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात दररोज पाऊस होत असल्यामुळे बळीराजा सुखावला, जिल्ह्याला हवामान विभागाचा यलो अलर्ट.
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी इथे रस्ता खचण्यास सुरुवात, संरक्षक भींतीचं काम अर्धवट राहिल्याने महामार्ग खचण्याची भीती, रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता.