Three-Language Policy: '...एक ना धड भाराभर चिंध्या', Hindi सक्तीवर नरेंद्र जाधवांनी सुनावलं

Continues below advertisement
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरणावरून (Three-Language Policy) पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव (Dr. Narendra Jadhav) यांनी रत्नागिरीत बोलताना या धोरणासंदर्भात महत्त्वाचे मत मांडले. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होईल,' असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदीची गरज नाही आणि याला राज्यातून विरोध होत आहे. त्यामुळे हिंदीची सक्ती पहिलीपासून न करता ती पाचवीपासून सुरू करावी, असे जाधव म्हणाले. राज्यातून हिंदी लोप पावत असल्याची भीती काही जण व्यक्त करत आहेत, तर काही जणांना हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होण्याची चिंता आहे, या विविध मतांचा आदर राखूनच समिती अहवाल सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola