एक्स्प्लोर
Ghodbunder Traffic Jam:'दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी',कामामुळे Mumbai-Ahmedabad हायवेवर वाहनचालक हैराण
ठाणे घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) गायमुख घाटामध्ये (Gaimukh Ghat) रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही (Mumbai-Ahmedabad Highway) झाला असून सातिवलीपर्यंत (Sativali) वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'ही दुरुस्ती मंगळवारी, १४ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे'. या कामामुळे मीरा-भाईंदर ते ठाणे प्रवास करणाऱ्या एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडली जात आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहनचालकांना बसत असून, रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. चुकीच्या दिशेने (wrong side) येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















