Infra Update: ठाणेकरांना मोठा दिलासा! आता 15 डब्यांची Local धावणार, Platform 2, 3, 4 होणार मोठे
Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे स्टेशनवरील फलाट क्रमांक दोन, तीन आणि चारची लांबी व रुंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 'मध्य रेल्वेच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली.' या कामामुळे सध्याच्या १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांची लोकल थांबवणे शक्य होणार आहे. फलाट क्रमांक दोनची रुंदी १६.१५ मीटरपर्यंत, तर फलाट क्रमांक तीन आणि चारची रुंदी ४० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुंबईच्या दिशेने हे काम युद्धपातळीवर सुरू असून, डिसेंबर २०२५ पर्यंत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विस्तारामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement