Thane Mahayuti : Shinde गटात अस्वस्थता, स्वबळाचा नारा देणाऱ्या BJP ला अजित पवार गटाचाही इशारा?
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) महायुतीमध्येच फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'जर तिन्ही पक्षांनी (ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस) एकत्रित लढलं तर मात्र शिवसेना आणि भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना देखील हे तीन गट भारी पडू शकतात', असे राजकीय विश्लेषक अक्षय भाटकर यांनी म्हटले आहे. भाजप (BJP) आणि अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) स्वबळाचा नारा दिल्याने शिंदे गटाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray), शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि काँग्रेस (Congress) एकत्र लढल्यास महायुतीला मोठे आव्हान मिळू शकते. गणेश नाईक (Ganesh Naik) आणि संजय खेडेकर यांच्याकडून सातत्याने पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला जात असल्याने निवडणुकीत हा प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement