Thackeray Reunion: 'लाला गेला गंगेला...', चंदू मामांनी सांगितला ठाकरे बंधूंच्या दिलजमाईचा क्षण

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन भावांचे मनोमीलन. अनेक वर्षांचा राजकीय आणि कौटुंबिक दुरावा संपवून हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. आज भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले असता, त्यांचे मामा चंदू वैद्य (Chandu Mama) यांनी आपला आनंद व्यक्त केला. 'हे आनंदाचा दिवस आहे. आज भाऊबीज आहे, आणि दोघंही एकत्र येत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे', अशी प्रतिक्रिया चंदू मामांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बहीण जयजयवंती यांच्या मुलाच्या, यश देशपांडेच्या, लग्नसमारंभात या दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्या, आणि तिथूनच त्यांच्या मनोमीलनाच्या चर्चांना उधाण आले. 'कटुता दूर झाली, आता नवीन पर्व सुरू झाले आहे आणि दोघांमधील प्रेम वाढतच राहील', असेही मामा म्हणाले. या ऐतिहासिक एकीमुळे तमाम मराठी माणसांमध्ये आणि ठाकरे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola