Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
महाराष्ट्रात वेगवेगळ्या महामार्गाचे काम झाले आहे.. पंढरपूर मोहोळ या पालखी मार्ग मधील 965 क्रमांकाच्या भागात कोट्यवधींचा गैरव्यवहार आहे.. या महामार्गावर अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात नुकसान भरपाईचा आदेश निवाडा झाला.. वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवगेळे दर जाहीर करण्यात आले..  मात्र, पेंदूर गावात नुकसान भरपाई देताना मोठे गैरव्यवहार झाले आहे.   जमीन अधिग्रहित झालेली नसताना नुकसानभरपाई मिळाली. काही जास्त जागा दाखवून पैसे मिळविले.. काहींनी जमिनीवर झाड नसताना ही झाडे दाखवत त्याचे ही पैसे नुकसान भरपाई म्हणून मिळविले.. ज्या अधिकाऱ्यांनी ही बोगस नुकसानभरपाई देताना मदत केली, पुढे त्याच अधिकाऱ्याने दोन साखर कारखाने उभे केले.. रमेश माने नावाच्या एका व्यक्तीने 2018 पासून वारंवार पैसे उचलले आहे.  रमेश माने नावाच्या त्या व्यक्तीचे मोठ्या सत्ताधारी नेत्यांसोबत संबंध असल्याने असे त्यालाच नुकसानभरपाईचे वारंवार पैसे मिळत आहे का??  जिथे पाइपलाइन नाही तिथे पाईपलाईन चे नुकसानभरपाईचे पैसे कसे दिले जाते..  *या भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का?? त्यांना सर्व माहिती आहे.. त्यांच्या कडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली होती.. चरण चौरे आणि रमेश माने या दोन शेतकऱ्यांच्या नावाने वारंवार अवॉर्ड कसे निघतात. वारंवार त्यांना नुकसान भरपाई कशी मिळते... योगायोगाने चरण चौरे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सोलापूरचा जिल्हाध्यक्ष आहे. ते रमेश माने हे सोलापूर मधील भाजपचे चे प्रमुख पदाधिकारी आहे. पेंदूर गावातून गेलेल्या पालखी मार्गात फक्त अडीच ते तीन किमी मध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे..  मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याबद्दल विधिमंडळात बोलले पाहिजे.. संबंधित विभागातील मंत्र्यांनी यावर बोलले पाहिजे.. अन्यथा राजीनामा दिला पाहिजे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola